प्रतिनिधी : मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार श्री राहुल रमेश शेवाळे यांनी शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत चेंबूर मधील रहिवाशांसोबत संवाद साधला. चेंबूरच्या नारायण आचार्य उद्यानात मॉर्निंग करणाऱ्या रहिवाशांनी यावेळी शेवाळे यांचे स्वागत करून त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेविका आशाताई मराठे देखील उपस्थित होत्या.
