Tuesday, April 29, 2025
घरदेश आणि विदेशअवयवदान वाढणे ही काळाची गरज - राजीव निवतकर

अवयवदान वाढणे ही काळाची गरज – राजीव निवतकर

प्रतिनिधी(रमेश औताडे) : कोणत्याही ठिकाणी असूद्या प्रतीक्षा यादी असतेच. आरोग्य विभागही त्याला अपवाद नाही. आपले अवयव किती अनमोल असतात याची आपल्याला किंमत नसते. आज राज्यात अवयव मागणी मोठी आहे. प्रतीक्षा यादी व मागणी पाहता अवयवदान वाढणे ही काळाची गरज  असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी व्यक्त केले.

आपण जग सोडून जाताना या जगाला काय देऊन जाणार या जागतिक विश्वसुंदरी स्पर्धेत ऐश्वर्या राय यांना विचारले असता त्या म्हणाल्या होत्या नेत्र दान करणार.माझ्या डोळ्यांनी माझ्या मृत्युनंतर कोणीतरी जग पाहू शकेल व माझ्या मृत्यू नंतर माझ्या शरीराचा एकत्र अवयव या पृथ्वीवर जिवंत असेल याचा मला आनंद होईल. या ऐश्वर्या राय यांच्या उत्तराने जगभर टाळ्यांचा कडकडाट झाला. असे हे अवयव दान किती महत्वाचे आहे हे त्यांनी जगाला सांगितले.

राज्यात अवयवदानाची संख्या कशी वाढवता येईल यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने अवयवदानाशी संबंधित रुग्णालयाचे प्रमुख आणि विभागीय प्रत्यारोपण समितीचे प्रमुख यांच्याशी बोलून आराखडा तयार करण्याचे सुरू आहे.या पार्श्वभूमीवर आयुक्त राजीव निवतकर यांनी एका बैठक बोलावली होती.त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला केईएम, नायर व जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता, विभागीय प्रत्यारोपण समितीचे प्रमुख डॉ सुरेंद्र माथूर, राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था, संचालिका डॉ सुजाता पटवर्धन, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे दोन खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments