Tuesday, April 22, 2025
घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन

प्रतिनिधी(रमेश औताडे) : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी मुंबई शहर व उपनगरात मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मुंबई हे मेट्रोपॉलिटन शहर आहे. मुंबईत टाचणी पडली तर जगभर आवाज जातो. या शहरात शुक्रवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अपक्ष उमेदवारांना पाठींबा देण्यासाठीही भावी आमदारांनी आपले कार्यकर्ते घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दक्षिण मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी अर्ज भरला.

तर अपक्ष उमेदवार ईशा ठाणेकर, कल्पना पवार, अनिता गालफाडे यांनीही दक्षिण मुंबईतून अर्ज भरला असता युवा से युवा या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदित्य महिमकर यांनी युवा कार्यकर्त्यांची एकच गर्दी केली होती.
त्यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक व्यवस्था वळविण्यात आली होती. तर मुंबई उपनगरात शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर, भाजपचे उत्तर मध्य मुंबईतून ऍडव्होकेट उज्वल निकम यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments