Sunday, April 20, 2025
घरमहाराष्ट्रपत्रकारितेत राजकारणा शिवाय दुसरे विषयही महत्वाचे - विजय कुवळेकर

पत्रकारितेत राजकारणा शिवाय दुसरे विषयही महत्वाचे – विजय कुवळेकर

प्रतिनिधी (रमेश औताडे) : राजकारणाशिवाय दुसरे इतर विषय ही महत्वाचे आहेत. प्राधान्य कशाला द्यावे याचे भान अपवाद वगळता काही मालक संपादक पत्रकार विसरत चालले आहेत. अनेक पत्रकारांना भूगोल, इतिहास, समाजशास्त्र इतर विषयाचे आकलन नाही. यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करून देण्याची गरज आहे.असे मत ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी महाराष्ट्र संपादक परिषद ने आयोजित केलेल्या पत्रकारिता गौरव आदर्श साहित्य पत्रकारिता सन्मान पुरस्कार व विशेष पुरस्कार २०२३ सोहळ्यावेळी व्यक्त केले.

शनिवार ४ मे रोजी मुंबईतील दादर- माटुंगा कल्चरल सेंटर, जे. के. सावंत मार्ग, माटुंगा पश्चिम येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला. होता. महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार श्यमाजी मालकर, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ संपादक शविजय कुवळेकर आणि जेष्ठ नाटककार शसुरेश खरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे दैनिक देशोन्नतीचे संपादक श प्रकाश पोहरे आणि जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुसंवादिनी शिबानी जोशी यांनी केले.तर मुंबई आऊटलूक मीडिया हाऊस चे मुख्य संपादक व महाराष्ट्र संपादक परिषद चे अध्यक्षसंजय मलमे यांनी आभार मानले.

पत्रकारिता साहित्य गौरव पुरस्कारासाठी झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक शकमलेश सुतार, दैनिक ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, दैनिक संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर, आयबीएन लोकमत चे प्रतिनिधी महेश तिवारी, एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पत्रकार ज्ञानदा कदम, पुण्य नगरी – ठाणे चे निवासी संपादक हेमंत जुवेकर, महाराष्ट्र टाइम्स चे प्रतिनिधी वैभव वझे, सीएनएन न्यूज १८ च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे (पंडित), मराठवाडा साहित्य संमेलन २०२३ चे माजी अध्यक्ष महेश माळवे, साप्ताहिक लोकवृत्तान्त चे संपादक एकनाथ बिरवटकर यांना पुरस्कार देण्यात आले.

पत्रकारिता साहित्य गौरव विशेष पुरस्कारासाठी जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी, दैनिक नांदेड एकजूटच्या जेष्ठ संपादिका अनुराधा विष्णूपुरीकर, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील आनंदराव (दादा) माईगडे, लोककला शाहीर रुपचंद चव्हाण यांना पुरस्कार दिले.

महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था कोणत्याही संघटनेशी समांतर किंवा स्पर्धात्मक कार्य न करता पत्रकारितेच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत राहणारी संस्था आहे. ही संस्था म्हणजे संपादक-मालक प्रामुख्याने दैनिकांचे व त्यांनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी यांची संघटना आहे. ही संस्था ध्येयासक्त, पारदर्शी आणि विश्वासार्ह आदर्श पत्रकारितेसाठी वचनबद्ध असेलेली संस्था आहे. ही संस्था मराठी भाषा, संस्कृती व अस्मितेशी वचनबद्ध असून, या संस्थेने वाचन संस्कृतीचे संवर्धन व ग्रंथालय चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. विविध प्रसार माध्यमांशी अनुबंध निर्माण करून त्यांच्या सहयोगातून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकजागृती यांसाठी सहभाग घेणे, पत्रकारांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणे, पत्रकारिता आणि साहित्य यांचा अनुबंध राखणे आणि नैसर्गिक आणि आपदग्रस्त पत्रकारांसाठी साहाय्य करणे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट राहिलेले आहे. तसेच या संस्थेतर्फे दरवर्षी आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्कार योजनेमधून राज्यस्तरीय मानवंत व गुणवंत पत्रकारांचा सन्मान केला जातो.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments