Thursday, April 17, 2025
घरमहाराष्ट्रउन्हाळ्याच्या दिवसात बिसलेरी चा आधार ; रेल्वे स्थानकातील प्रवासी पाणपोई कोरड्या….

उन्हाळ्याच्या दिवसात बिसलेरी चा आधार ; रेल्वे स्थानकातील प्रवासी पाणपोई कोरड्या….

प्रतिनिधी(रमेश औताडे) : उन्हाळ्याचे महिने सुरू झाले आहेत. घामाच्या घटने शरीर ओलेचिंब होत आहे असा उन्हाचा पारा चढला आहे. सूर्य आग ओकत असताना रेल्वे प्रवासी स्थानकातील प्रवासी पाणपोई कोरड्या असल्याने खिष्याला चाट देत बिसलेरी पाणी बाटली घेऊन पित आहे. काही रेलवेस्तोल वर थंड पाणी बाटली मिळत नाही तर काही ठिकाणी बोगस कंपनी ची बाटली मिळत आहे.

सरकारने एक रुपयात बिसलेरी पाणी बॉटल भरून देण्याचे स्वयंचलित मशीन स्टॉल सुरू केले होते. कंत्राट दराचे खिसे भरल्यानंतर हे पाणी गायब झाले व कालांतराने स्टॉल ही गायब झाले. त्या ठिकाणी नवीन कंत्राटदार नेमणूक करून टेंडर घोटाळा झाल्यानंतर तेही बंद झाले.

पूर्वी गुजराती जैन समाज देणगी म्हणून रेल्वे स्टेशन वर संगमरवरी लाद्या बसवत साखळी लावलेले ग्लास बांधून पाण्याची सोय मोफत करत होते. चाकरमानी घामाच्या घरा तोंड धुवत ओंजळीने पाणी पिऊन तृप्त ढेकर देत असत. आता खिशात हात घातल्याशिवाय बिसलेरी ची तहान भागत नाही व ढेकर ही येत नाही

सरकार कोणाचेही असो सामान्य जनता आजही त्रस्त आहे. अच्छा दिन चे कमळ किंव्हा गरिबो के साथ वाला हात कोणीही गरिबांना मोफत पाणी पाजणार नाही असे प्रवासी बोलत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments