प्रतिनिधी : करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आज मुंबई येथील “मुक्तागिरी” निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या प्रवेशप्रसंगी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख व श्री. शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे, शिवसेनेचे करमाळा-माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, तसेच सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथील माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांचीही उपस्थिती होती.
जयवंतराव जगताप हे 1990 साली अपक्ष व 2004 साली शिवसेना उमेदवार म्हणून दोन वेळा आमदार झाले होते. तसेच 2019 मध्ये संजय (मामा) शिंदे व 2024 मध्ये नारायण (आबा) पाटील यांच्या विजयात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक स्व. नामदेवराव जगताप चार वेळा आणि चुलते स्व. अण्णासाहेब जगताप एकदा आमदार होते, अशी राजकीय वारसा लाभलेली ही घराणी आज पुन्हा शिवसेनेच्या सोबत जोडली गेली आहे.
या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला महत्त्वाचा लाभ होणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळावा आयोजित केला जाणार आहे.
यावेळी माजी आमदार जगताप यांनी म्हटले की, “श्री. एकनाथ शिंदे साहेब हे विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली धनुष्यबाण चिन्हावर करमाळा नगरपालिका, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकव