Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रचर्मकार समाजातील नेते पदाधिकाऱ्यांची रविवारी धारावीत संवाद परिषद होणार

चर्मकार समाजातील नेते पदाधिकाऱ्यांची रविवारी धारावीत संवाद परिषद होणार

प्रतिनिधी- चर्मकार समाजात चांभार, ढोर, होलार, मचिगर, कक्कया, हरळया, मादिगा, जैसवर, अहिरवार, मोची व जाट अशा अनेक जाती, पोट जाती देशात असून या जातींचे,समाज स्तरावर प्रतिनिधित्व करणारे प्रमुख प्रतिनिधी,पदाधिकारी आणि या समाजातील सर्व प्रमुख नेत्यांची एक संवाद परिषद रविवारी २९ जून रोजी सकाळी १०.३० वा. पासून धारावीमधील मनोहर जोशी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्मकार संघाने आयोजित केलेली आहे. ही परिषद या संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार बाबुराव माने यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या संवाद परिषदेला समाजातील प्रमुख उद्योजक, व्यापारी, वकिल, डाॅक्टर, कवी, लेखक आणि समाज कार्यकर्ते अशा सर्वांनाच या संवाद परिषदेला आमंत्रित केले आहे.
आपला सगळ्यांचा निकटचा संबंध हा चामड्याशी आहे.यामुळे आपल्या समाजात पोटजाती नाहीत.सगळ्यांची जात एकच आहे. ती आहे चर्मकार. संत रोहिदास महाराज यांचा आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांच्या वाटेने चालणारी आमचा राष्ट्रीय चर्मकार संघ आहे. हा संघ वेळोवेळी समाजात वैचारिक स्तरावर संवाद बैठका घेत असतो त्याला अनुसरूनच ही परिषद होणार असल्याचे बाबुराव माने यांनी सांगितले.
या संवाद परिषदेला समाज ऐक्याला बळकटी देणे, समाज बांधवांनी चर्मउद्योगांसाठी राज्य शासनाच्या लिडकाॅम मार्फत घेतलेली कर्जे माफ करण्याबाबत, शहरी-ग्रामीण चर्मकार व्यावसायिकांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे निवारण, शेतकऱ्यांच्या धर्तीवर आपत्ती काळात चर्मकार व्यावसायिकांनाही कर्ज माफीचे धोरण लागू करावे आदी प्रमुख मुद्द्यांवर या संवाद परिषदेला समाजातील प्रमुख नेते चर्चा करुन या मुद्द्याचा समाजाच्या सर्वागिण विकासासाठी एक निश्चित धोरण बनवतील, असे या संवाद परिषदेचे आयोजक बाबुराव माने यांनी स्पष्ट केले आहे.
या संवाद परिषदेला राष्ट्रीय चर्मकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष मीराताई शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगांवकर, मुंबई महिला प्रदेशाध्यक्षा शारदाताई नवले, (भगत) मुंबई प्रदेश महासचिव गणेश खिलारे, मचिगर समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड सिध्दनाथ हातरकर, परशुराम इंगोले, प्रा.चंद्र प्रकाश देगलुरकर, अशोकराव आगवणे, शाहीर संभाजी भगत, अ‍ॅड रमेश हंकारे आदी समाज बांधव ,समाज नेते पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळेस उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments