Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्रवायफळ चर्चा करण्यापेक्षा सातारकरांनी मतदान करून मर्दानगी दाखवावी..

वायफळ चर्चा करण्यापेक्षा सातारकरांनी मतदान करून मर्दानगी दाखवावी..

सातारा (अजित जगताप) : लोकशाहीने मतदानाचा सर्वात मोठा अधिकार दिलेला आहे. या अधिकाराची जाणीव करण्यासाठी निवडणूक आयोग,सातारा जिल्हा प्रशासन व सामाजिक सेवाभावी संस्था जीवाचे रान करत आहेत .जनजागृती करण्यासाठी पायपीट करत आहेत. अशा वेळेला खेड्यापाड्यातील पारावर वायफळ राजकीय चर्चा करण्यापेक्षा योग्य उमेदवाराला मतदान करून मर्दानगी दाखवावी. असे आवाहन लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी झटणारे कार्यकर्ते करत आहेत. . सातारा जिल्ह्यातील माण- खटाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव, सातारा- जावळी ,फलटण, वाई- महाबळेश्वर- खंडाळा व पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये दि: २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी सर्व सुख सुविधा एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार बंधू-भगिनींसाठी शासनाने योग्य ती दखल घेतलेली आहे. मतदान केंद्रावर जाण्यापेक्षा आपल्या घरातच मतदान करण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. कुशल व कुशल कामगारांना मतदान करावे. यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदारांची नैतिक जबाबदारी महत्वपूर्ण ठरलेले आहे.
आपलं एक मत हे योग्य उमेदवाराच्या पारड्यात टाकल्याने पर्यायी देश- राज्य — तालुका व गावचा विकास होणार आहे. याची जाणीव सर्वांनाच आहे. परंतु, काही वेळेला कोणत्या तरी किरकोळ कारणामुळे मतदार मतदान करत नाहीत. त्यामुळे शासकीय यंत्रणा व राजकीय पक्षआणि उमेदवारांनी प्रसार माध्यमातून केलेला प्रचार उपयुक्त असून सुद्धा अशा काही मतदारांना काळजी नसते. ही गंभीर बाब बनलेली आहे. राजकीय चर्चा करण्यासाठी काही मतदार हे हातातले काम थांबून त्या चर्चेत सहभागी होतात. लोकशाहीने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. पण, मतदार म्हणून मतदानाचाही अधिकार सर्वोच्च अधिकार आहे. त्याची अंमलबजावणी करणे. सुदृढ लोकशाहीसाठी उपयुक्त आहे. याची जाणीव ठेवून सर्वांनीच मतदान करणे गरजेचे आहे.
काही वेळेला उमेदवार पसंत नाही. असे असले तरी साधक बाधक विचार करून उमेदवार पसंत नसल्याचा नोटा हा पर्याय दिलेला आहे. त्याला जरी आपण मतदान केले तरी त्याचीही दखल मतमोजणीच्या वेळी घेतली जात आहे. एवढे महत्व मतदानाला आहे. आपण एखाद्या शुभकार्यासाठी जाताना चांगली कपडे घालून जातो. जेणेकरून लोकांनी आपल्याकडे पाहिले पाहिजे. असा काहींच्या समज असतो. तशाच पद्धतीने मतदान केल्यानंतर आपल्या बोटाला लागलेली शाही हे लोकशाही व मतदार शाही याचे प्रतीक आहे. आपल्या बोटांचे सौंदर्य आहे. ते सुद्धा दाखवण्यास कोणी कमीपणा बाळगू नये. कारण ,हे सौंदर्य आपल्याला लोकशाहीचे राजे म्हणून शिक्कामोर्तब करणारे आहे. त्यामुळे ज्या गावात जास्तीत जास्त मतदान होईल. त्या गावांमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधींनी विकास निधी देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. असाही जेष्ठ नागरिकांनी सल्ला दिलेला आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. याचा जसा अभिमान आहे. तसा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा नोंद व्हावी. यासाठी आता सर्व सातारकर मतदारांनी मतदान करावे. असेही पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांनी अधोरेखित केलेले आहे. सातारा जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व सहाय्यक निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, व सर्व कर्मचारी दिलेली जबाबदारी समर्थपणाने पार पाडत आहेत. निवडणुकीतील प्रचारांच्या मुद्द्यांचे प्रसार माध्यम प्रमाणितीकरण करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभत आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन करून सर्वांनीच ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडावी. यासाठी मतदारांनी ही कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणाने पालन होत आहे. परंतु, त्याबाबत जर कोणी अनावधनाने पालन केले नाही तर कोणताही दुजा भाव न करता संबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये त्याचा समावेश केला जाईल. हे स्पष्ट करण्यात आली आहे. याकडेही अनेकांनी लक्ष वेधले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments