कराड(प्रताप भणगे)
: खालकरवाडी (ता. कराड) येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन निधी २०२३-२४ अंतर्गत गावातील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन मा. पाटील यांच्या शुभहस्ते, तर जेष्ठ नागरिक संभाजीराव खालकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष देवराजदादा पाटील, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश (बापू) माने, जयंत जाधव, संजय गोरे, बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव, उध्दवराव फाळके, बाबुराव माने, गोविंदराव माने, संभाजी पवार, किसन पवार, हौसेराव माने, हिम्मतराव यादव, सुनील पवार, हौसेराव सुर्यवंशी, महेश यादव, जालिंदर खोचरे, सरपंच सौ. कामिणी इंगळे, उपसरपंच हौसेराव जाधव, तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संदीप मोरे उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेला हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.