Monday, September 22, 2025
घरमहाराष्ट्रबंट्स महासंघा तर्फे गोपाळ शेट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित

बंट्स महासंघा तर्फे गोपाळ शेट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित


मुंबई(प्रतिनिधी) : श्रीमती राधाबाई भंडारी ऑडीटोरीयम कुर्ला येथे जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला.
बट्स (शेट्टी) यांची अखिल जागतिक संघटने द्वारे गरजवंताला विविध पद्धतीने सहाय्य करणे ह्या उद्देशाने स्थापन झालेल्या व मुंबईत गेल्या ६ वर्ष एकला हरिष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व जागतिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ही संघटना काम करत आहे. सामजिक मदत वैद्यकीय मदत तसेच कला क्रीडा क्षेत्रातील गरजू प्रविण प्राप्त खेळाडूंना विशेष सहाय्य ही संस्था करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जनसेवक गोपाळ शेट्टी ह्यांच्या मागे ही संघटना व बंट्स समाज नेहमीच उभे राहिले आहेत. ह्या समाजाला नेहमीच प्रोत्साहन व मार्गदर्शक म्हणून गोपाळ शेट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments