Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात शिवसैनिकांसोबत माजी सैनिक प्रचाराच्या रणांगणात…

साताऱ्यात शिवसैनिकांसोबत माजी सैनिक प्रचाराच्या रणांगणात…



सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्हा हा
सेना दलातील जवानांसाठी जगप्रसिद्ध आहे. याच सैनिकातून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची खूप मोठी संघटना असून त्यापैकी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांसोबत माजी सैनिक सुद्धा राजकीय रणांगणात उतरले आहेत.
आज साताऱ्यात शिवसेना नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हा माजी सैनिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष श्री. मनोज कुमार डांगे- सूर्यवंशी व निलेश निकम, इंद्रजीत भिलारे, सो भारती बर्गे, सौ .उर्मिला पवार, संजयकुमार निंबाळकर व आप्पा पडवळ, सचिन साबळे, शंकरराव खापे ,शांतीलाल होळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज साताऱ्यात माजी सैनिकांचा मेळावा झाला.
यावेळी महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या प्रश्नासोबतच सातारा जिल्ह्यातही माजी सैनिक विकास कामांमध्ये योगदान देतील. त्यामुळे त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विचार व्हावा. अशी जोरदार मागणी करण्यात आली.एक तरी माजी सैनिक सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पाठविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दया. असे आवाहन श्री डांगे सूर्यवंशी यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी स्वतःचे देश प्रेमी सोबतच आता राजकीय अस्तित्व दाखवून देणे गरजेचे आहे. सर्वांनी एकमेकांना ताकद दिली पाहिजे. आपण देशाच्या सरहद्दीवर लढणारे सैनिक आहोत. सर्व जातीतील समाज एक होतो. आता देशाच्या सरहद्दीवर लढणाऱ्या माजी सैनिकांनी आपापल्या गावात एक झाले पाहिजे.
विधानसभेच्या निवडणुकीत घोडा व मैदान जवळ आहे. कोरेगाव, पाटण, सातारा – जावळी शिवसेना उमेदवार निवडून देण्यासाठी माजी सैनिकांनी प्रयत्न करावा असे स्पष्ट केले .

या वेळेला माजी सैनिक संपत गीते, प्रवीण शिंदे, हनुमंत जगताप व सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा परिसरात जय जवान… जय किसान… जय शिवाजी महाराज, जय महाराष्ट्राचा नारा देण्यात आला. प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच माजी सैनिकांना आघाडीच्या विविध पदावर टाळ्यांचा कडकडाट्सह नियुक्ती देण्यात आली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments