Friday, September 19, 2025
घरमहाराष्ट्रदिव्या ढोले यांची घरकामगारांसाठी महत्वाची मागणी

दिव्या ढोले यांची घरकामगारांसाठी महत्वाची मागणी

मुंबई : राज्यातील घरकामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडे नोंदणी करावी लागते. मात्र नोंदणी करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे हि नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्या दिव्या ढोले यांनी सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्र घरकामगार कल्याण मंडळाची स्थापना २००८ मध्ये झाली असली तरी नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया अजूनही पूर्णपणे मॅन्युअल पद्धतीने सुरू आहे. घरकामगारांना मंडळाच्या कार्यालयात जाऊन अर्ज घेणे, तो भरून आवश्यक कागदपत्रे जोडणे, नियोक्त्याची सही मिळवणे, नंतर बँकेत जाऊन शुल्क भरणे आणि पुन्हा मंडळाकडे पावती जमा करणे अशा त्रासदायक प्रक्रियेत वेळ व पैसे खर्च होत आहेत. मोठ्या प्रमाणावर घरकामगार नोंदणीपासून वंचित राहतात आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवू शकत नाहीत. तसेच कल्याणकारी योजनांसाठीही पोर्टल उपलब्ध करून द्यावे. या प्रणालीमुळे मंडळाचे उद्दिष्ट असलेले अचूक आकडेवारी संकलन व शासकीय लाभांचा योग्य वितरण अधिक प्रभावीपणे साध्य होईल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments