Friday, September 19, 2025
घरमहाराष्ट्रक्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव NH-166H ला देण्याची मागणी — अन्यथा तीव्र...

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव NH-166H ला देण्याची मागणी — अन्यथा तीव्र रस्ता रोको आंदोलनाचा इशारा!

कराड(विजया माने) : यूदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना योग्य सन्मान मिळावा म्हणून NH-166H पेठ-सांगली राष्ट्रीय महामार्गाला त्यांचे नाव देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देत अनेक शारीरिक, मानसिक, आर्थिक हालअपेष्टा सहन करत स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान दिले. त्यांचा त्याग आणि संघर्ष अजरामर आहे. त्यामुळे रस्त्याला त्यांच्या नावाने ओळख दिली जावी, अशी मागणी क्रांतीसिंह नाना पाटील जन्मभूमी मार्क समितीचे अध्यक्ष गणेश दादा शेवाळे यांनी केली आहे.

या मागणीसाठी PWD विभाग आणि सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास ‘पेठ-सांगली रोड’ वर तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

निवेदन देताना PWD चे कार्यकारी अभियंता श्री. पाटील व उपअभियंता बर्गे मॅडम उपस्थित होते. यावेळी परिसरात घोषणाबाजी करत काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.

या आंदोलनात अनेक शेतकरी संघटनांचे, राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रमुख उपस्थिती होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना: शहाजी पाटील, विलास पाटील, प्रवीण पाटी, शिवसेना: राजेंद्र पाटील, रयत शेतकरी संघटना: हमीद हसनमुल्ला, भाजप: प्रमोद सुतार, राष्ट्रवादी काँग्रेस: यदुराज थोरात, बळीराजा शेतकरी संघटना: मदन पाटील, हेमंत माळी, ग्रामस्थ व कार्यकर्ते: मानसिंग पाटील, पंडित माळी, सचिन पाचुंबरे, सयाजी पाटील, शिवाजी मोरे, इ.
“रस्त्याला क्रांतिसिंह नाना पाटलांचे नाव न दिल्यास आम्ही शांत बसणार नाही,” असा ठाम इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments