नेरूळ : कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्था (रजि) यांच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन सोमवार १४ एप्रिल रोजी नेरूळ येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यात नवविवाहित जोडप्यांना समाजातील मान्यवरांचे शुभाशीर्वाद लाभावेत यासाठी सर्वांना सस्नेह आमंत्रित करण्यात आले आहे.
जावळी-महाबळेश्वर तालुक्यात सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा संकल्प संस्थेने घेतला असून, मागील १४ वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीरित्या सुरु आहे. विवाह सोहळ्यासोबतच वधू-वर परिचय मेळावा, सह्याद्री जल्लोष, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबिर यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे संस्था समाजसेवा करत आहे.
या मंगलप्रसंगी समाजबांधवांनी उपस्थित राहून नवविवाहितांना शुभाशीर्वाद द्यावेत व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.