Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रबृहन्मुंबई महानगर पालिका जी उत्तर विभागामध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साही;...

बृहन्मुंबई महानगर पालिका जी उत्तर विभागामध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साही; वातावरणात संपन्न!

प्रतिनिधी : भारत देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन जी उत्तर विभागामध्ये सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडला.
सुरुवातीला विसपुते यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून तिरंगाझेंडा फडकविण्यात आला,तद्नंतर उपस्थितांनी झेंड्याला सलामी देवून सामुहिकपणे सुरुवातीला राष्ट्रगीत व नंतर महाराष्ट्र गौरवगीत म्हणण्यात आले.
या कार्यक्रमानिमित्त महानगर पालिका शाळेतील विद्यार्थीनी कवायती व विविध नृत्य केले.
कवायती व नृत्य नेत्रदीपक असल्यामुळे सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचे तोंड भरुन कौतुक करुन सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित यांना सहाय्यक आयुक्त विसपुते संबोधित करताना म्हणाले की आज आपला देश प्रगतीपथावर आहे या प्रगतीमध्ये आपली महानगर पालिका म्हणून आपण सर्वजण कार्यरत आहात म्हणून आपले सर्वांचे कौतुक, अभिनंदन व धन्यवाद करून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच
या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन केल्याबद्दल सहाय्यक आयुक्त यानी आयोजकांचे कौतुक व अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी जी उत्तर विभागातील सुरक्षारक्षक सर्व खात्यातील अधिकारी,कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी आणी शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता सहाय्यक आयुक्त यांनी सर्वाना शुभेच्छा देऊन व गृप फोटो काढून करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी संगीता

डुंबरे मॅडम यांनी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments