Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रअर्जुन विष्णू जाधव साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित

अर्जुन विष्णू जाधव साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित

ठाणे : निर्भिड व परखडपणेच लिहिणारे नव्या दमाचे लेखक, कवी आणि पत्रकार अर्जुन विष्णू जाधव यांना मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने अर्थात पत्रकार दिनी सा. ठाणे नवादूत याच्या वतीने ‘ साहित्य रत्न ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अर्जुन विष्णू जाधव मुंबई ठाणे येथील वृत्तपत्रांतून झाली वीस-पंचवीस वर्षे आपलया निर्भिड व परखड लेखणीतून रोखठोकपणे सामाजिक जनजागृती व जन प्रबोधन करणारे लेखण करत असतात. त्याची पत्रकारितेसोबतही विविध विषयांवर ‘ जागर,बेळगाव कुणाच्या बापाचं, बागलकोटची सुगंधा, माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार, लेक जगवा लेक शिकवा, व्यसनमुक्ती, प्रेयसी एक आठवण ‘आदी पुस्तके प्रसिद्ध झालेली असून महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, मंडळ, संघटना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments