कराड(प्रताप भणगे) : मौजे साजूर ता.कराड येथे श्री विक्रम मूळगांवकर यांनी आयोजित केलेल्या बैठकी वेळी त्यानी युवकाशी संवाद साधून आडअडचणी जाणून घेऊन सोडविण्याची ग्वाही दिली. यावेळी – अँड उदयसिंह पाटील म्हणाले साजूर गावाने नेहमीच स्व. लोकनेते विलास काका पाटील – उंडाळकर यांचा विचाराची पाठराखण केली आहे . काकाचे साजूर गावातील विकासकामा मध्ये मोठे योगदान आहे . याची जाणीव युवक वर्गालाआहे . हे आज मला प्रकर्षाने जाणवले. येथून पुढे हि आतापर्यत जशी साथ दिलीत अशीच साथ राहु दया,आपण ज्या काही अडचणी मांडल्या आहेत त्या. मी प्रामणिकपणे सोडवीन अशी ग्वाही दिली . यावेळी, प्रा धनाजी काटकर सर, प्रदिप पाटील, श्रीमंत काटकर, रघुनाथ नलवडे, हणमंत देसाई वाठारकर, ज्येष्ठ नेते हणमंतराव चहाण, मोहन चव्हाण, संजय मूळगांवकर, विक्रम मूळगावकर, मा.सरपंच शतिल मूळगांवकर, संजय चव्हाण (आप्पा) वैभव चव्हाण.इ . मान्यवर उपस्थित होते.
अँड उदयसिंह पाटील — उंडाळकर यांनी साजूर येथील युवकाशी साधला संवाद
RELATED ARTICLES