ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

परभणी प्रकरण सरकारने गांभिर्याने घेऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी – खा. वर्षा गायकवाड

प्रतिनिधी : परभणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालून संविधानाची विटंबना करण्यावर त्वरीत कठोर कारवाई केली असती तर पुढच्या घटना घडल्या नसत्या. पण त्यावेळी सत्ताधारी लोक मंत्रिमंडळ बनवण्यात व्यस्त होते त्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. जनतेत असलेला असंतोष थांबवण्याची जबाबदारी सरकारची असून भाजपा युती सरकाने परभणी प्रकरण गांभिर्याने घेऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.

परभणी व बीड प्रकरणी संसदेतही आवाज उठवण्यात आला. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अटक केलेली नाही. महायुती सरकारच्या या अपयशावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, परभणी पोलिसांनी अनेक निरपराध व्यक्तींना जेलमध्ये टाकले. जे लोक याप्रकरणी आवाज उठवत होते त्यांचा आवाज दडपण्याचे काम पोलीसांनी केले आहे. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुर्यवंशी यांना मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी विजय वाकोडे हे पाच सहा दिवसापासून शांततेने या प्रकरणी काम करत होते, त्यांचा ह्रदय विकाराने मृत्यू झाला. परभणी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी व सोमनाथ सुर्यंवशी यांच्या कुटुंबाला सरकारने २५ लाख रुपयांची मदत करावी याचा वर्षाताई गायकवाड यांनी पुनरुच्चार केला. पोलिसांनी निरपराध लोकांना अटक करु नये, जनतेने शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Scroll to Top