मुंबई : तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज, आचार्य तुषार भोसले तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. आषाढी वारीदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.




