कुसुंबी(अजित जगताप) : राजकारणामध्ये आपल्याला मिळालेली संधी कोणी सोडत नाही. वेळ आली तर पक्ष निष्ठा आणि जात बदलून उमेदवारी घेणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. अशातच अनुकूल राजकीय परिस्थिती असतानाही युवा नेते श्री सागर धनावडे यांनी विजयाची माळ आपल्या गळ्यातील काढून दुसऱ्याला उमेदवारी सकट देण्याचा उपक्रम राबवला. सागरा सारखे मन असलेल्या श्री धनावडे यांनी मतदारांची ही मन जिंकले
जावळी तालुक्यातील श्री काळुबाई देवस्थान मुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्चेत आलेल्या कुसूंबी जिल्हा परिषद गटात जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे निकटवर्तीय व भाजप नेते तथा निवडणूक प्रभारी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक युवा नेते सागर धनावडे म्हणजे दृष्टीचे प्रतीक आहेत.दांडगा जनसंपर्क असूनही आता भाजपच्या उमेदवाराची मते मागण्यासाठी वाड्या वस्ती पिंजून काढत आहेत. आहे. आंबेघर गणात इतर मागासवर्गीय आरक्षण असताना व स्वतःकडे कुणबी मराठा प्रमाणपत्र असताना देखील श्री सागर धनावडे यांनी मूळ इतर मागासवर्गीय यांना संधी देण्याचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांनी आग्रह केला असता तर पक्षश्रेष्ठी नाही त्यांना उमेदवारी द्यावी लागली असती ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. तरीसुद्धा घेणाऱ्याचे घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं त्यांचे वागणे. राजकारणामध्ये आदर्श ठरले आहे.
जावली पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे सभापती पदावर ते नक्कीच विराजमान झाले असते. जवळी दूध संघाचे माजी व्हाइस चेअरमन कैवारी विजय धनावडे यांनी काँग्रेस विचारधारा जतन केली होती. माजी आमदार कैवारी जी. जी. कदम, भिकू दाजी भिलारे गुरुजी, लालसिंगराव शिंदे यांच्या विचारांचा वारसा जपला होता. वैचारिक भूमिका तशीच ठेवून कै. विजय धनावडे यांनी सुद्धा अनेकांना संधी दिली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव श्री सागर धनवडे यांनी विचारांचा वारसा सुद्धा जपला आहे. इतर मागासवर्गीयांना न्याय देऊन ते खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी विचाराचे पाईक ठरले आहेत. भाजप पक्षासाठी त्यांचा सन्मान राखून त्यांना चांगले पद द्यावे अशी मागणी आता इतर मागासवर्गीय मागासवर्गीय तसेच सर्व जाती धर्मातील जावळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
———— ——– —— ———– —-
फोटो– आपल्या नेत्यांना निष्ठा बहाल करणारे श्री सागर धनवडे




