प्रतिनिधी : महाराष्ट्र व गुजरातमध्ये 64 शाखांद्वारे कार्यरत, रिझर्व्ह बँक मान्यता प्राप्त नामांकित एनबीएफसी उन्नत्ती फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड यांनी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्य निधीस आर्थिक मदत प्रदान केली. कंपनीच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे योगदान सुपूर्द केले.
नवी मुंबईतील सानपाडा येथे मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीने दोन्ही राज्यांत मिळून 500 हून अधिक युवकांना रोजगार दिला असून कंपनीचा एकत्रित व्यवसाय 600 कोटींपेक्षा अधिक आहे. सूक्ष्म लघुकर्ज, सोने तारण कर्ज आणि मालमत्ता तारण कर्ज या क्षेत्रात कार्यरत असलेल्या उन्नत्ती फिनसर्वने शेकडो लहान व्यावसायिकांना कर्जाच्या माध्यमातून आर्थिक उभारी दिली आहे.
फायनान्स क्षेत्रातील मराठी उद्योजकांपैकी कंपनीचे संस्थापक श्री हनुमंत रांजणे (मूळचे जावली तालुका, सातारा) हे एक उल्लेखनीय नाव आहे. या भेटीचे नियोजन व समन्वय करण्यात धगधगती मुंबईचे संपादक पत्रकार श्री भीमराव धुळप यांचे विशेष सहकार्य लाभले.




