ताज्या बातम्या

रोटरी रन फॉर कॅन्सर अवेअरनेस मॅरेथॉन उत्साहात संपन्न

कराड(विजया माने) : रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांच्या वतीने ‘रोटरी रन फॉर कॅन्सर अवेअरनेस’ ही मॅरेथॉन धाव स्पर्धा उत्साहात पार पडली. ढेबेवाडी फाटा रोडवर आयोजित तीन किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत शहरासह ग्रामीण भागातील मुला–मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

स्पर्धा 14 वर्षे व 18 वर्षे अशा दोन वयोगटांत घेण्यात आली. प्रत्येक गटातून प्रथम पाच विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

ए. पी. स्पोर्ट्सचे रो. अतुल पाटील व रो. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन सुरळीत पार पडले. कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब मलकापूरच्या सर्व सदस्यांनी फलक दाखवून रस्त्यावर जागरूकता रॅली काढली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल जामदार होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण करून कॅन्सर प्रतिबंधाचे महत्त्व स्पष्ट केले. सचिव विजय दुर्गावळे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले.

या उपक्रमात रोट्रॅक्ट क्लब मलकापूरच्या सर्व तरुण सदस्यांचा सक्रिय सहभाग होता. एकंदरितच, कॅन्सरविषयी जागृती आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारी ही धाव क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्तपणे यशस्वी केली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top