तळमावले/वार्ताहर : ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्ये खूपच धन्यता वाटते. त्यांच्या सेवेतच खरा आनंद व परमार्थ पहायला मिळतो. असे प्रतिपादन डाॅ.बाळासाहेब पडवळकर यांनी केले. ते शिव आरोग्य सेवा मल्टी स्पेशालिटी को.ऑप. हाॅस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर लि; शिव आरोग्य सेवा हाॅस्पिटल, तळमावले आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित स्मृती आरोग्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे तात्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. याप्रसंगी तज्ञ मार्गदर्शक म्हणून डाॅ.ओमकार शहाणे, तर मान्यवर म्हणून शिवसमर्थ समुहाचे कुटूंबप्रमुख ॲड.जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, पंजाबराव देसाई, राजाभाऊ माने, आप्पासोा निवडूंगे नितीन पाटील, अक्षय पाटील, अविनाश लोकरे, तुकाराम डाकवे, पांडूरंग जाधव, शामराव डाकवे, शिवाजी डाकवे, विठ्ठल डाकवे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
राजाराम डाकवे (तात्या) स्मृती आरोग्य शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टर व स्टाफ कडून नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी, त्वचारोग व कुष्ठरोग तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, एक्स रे, क्षयरोग तपासणी, शल्यचिकित्सा तपासणी, मधुमेह, हिमोग्लोबीन, थायरॉइड, कावीळ, सिफिलीस, यकृत व किडणी कार्य चाचणी, एच.आय.व्ही चाचणी सह महालॅब मार्फत इतर सर्व प्रकारच्या महत्वाच्या तपासण्या मोफत करुन विविध रोगांवर उपचार आणि मार्गदर्शन केले.
डाकेवाडीसारख्या दुर्गम भागात असा आरोग्य कार्यक्रम प्रथमच राबवल्याने नागरिकांनी उत्साहाने त्याचे स्वागत केले. वाडीतील सुमारे 70 ते 80 लोकांनी याचा लाभ घेतला. यासाठी शिव आरोग्य सेवा हाॅस्पिटलचे एचआर शंकर सकट, पीआरओ विशाल बडेकर, पल्लवी भाईगडे, प्रकाश चव्हाण, आदित्य साळुंखे, सविता देसाई, अश्विनी लावंड, स्वप्नाली गायकवाड, बाबुराव कांबळे, पुजा गायकवाड, भगवान माने, दिलीप चोरगे, संकेत भोसले, प्रियांका डांगे, प्रणिता जाधव व अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
प्रारंभी शिवसमर्थ लोगो, स्व.राजाराम डाकवे (तात्या) च्या प्रतिमा आणि पुतळयाचे पुजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रा.ए.बी.कणसे यांनी मानले.
महंत अहील्यादेवी महाराज, सुप्रसिध्द ज्योर्तियवेद सतीश तवटे मारुती तुपे, डाॅ.राहूल बडेकर, ह.भ.प.जयश्रीताई धायटी, शिवम् असोसिएटसचे गुलाब जाधव (फौजी), यांसह अन्य नातेवाईक, पाहुणे, मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली. तात्यांच्या आकस्मिक निधनाने एक धडपडया, सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न हरपल्याची भावना यावेळी लोकांनी व्यक्त केली. तसेच डाकवे परिवाराने तात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवलेल्या सर्व उपक्रमाचे कौतुक करत त्यांचा आदर्श इतरांनी घेण्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
तात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, सार्वजनिक वाचनालय इ.उपक्रम राबवत वडीलांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे संदीप डाकवे आणि डाकवे परिवाराने सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गयाबाई डाकवे, सुमन डाकवे, भरत डाकवे, रेश्मा डाकवे, गौरी डाकवे, पारुबाई येळवे, सविता निवडूंगे, रत्नाबाई काळे, नंदा डाकवे, सुनील मुटल, आशा मुटल, जिजाबाई मुटल, लक्ष्मी डाकवे, अनुसया डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, स्पंदन डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
नागरिकांच्या आरोग्य सुधारणेसाठी महत्त्वाचा कार्यक्रम :
स्व.राजाराम डाकवे (तात्या) स्मृती कार्यक्रम हा डाकेवाडीतील नागरिकांच्या आरोग्य सुधारणेसाठी महत्त्वाचा ठरला असून मोफत तपासणी मार्गदर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून आला. हा कार्यक्रम सामाजिक आणि आरोग्यदायी जागरुकतेसाठी एक आदर्श पाऊल ठरला आहे.