कराड : निनाईदेवी विद्यालय, तुळसण येथील विद्यार्थीनी श्रुती गणेश थोरात हिने मसूर येथे झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत आपले कुस्ती कौशल्य सिध्द करत प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील ५७ किलो वजन गटात विजेतेपद मिळवत श्रुतीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रुतीच्या या यशाबद्दल निनाईदेवी विद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.