Friday, September 19, 2025
घरमहाराष्ट्रछत्रपतींच्या आदेशाचा मावळा... ...प्रीतम कळसकर

छत्रपतींच्या आदेशाचा मावळा… …प्रीतम कळसकर

विशेष लेख अजित जगताप यांचेकडून :

काही व्यक्ती या सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान असावी यासाठी जन्म घेतात. आणि त्यांच्या कार्यामुळे अनेक गोरगरिबांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते. सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपल्या कार्याने सर्वांचं लक्ष वेधून घेणारे युवा नेते प्रीतम कळसकर यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. छत्रपतींच्या आदेशाचे अंमलबजावणी करणारे अनेक बावळे आहेत त्यापैकी प्रीतम कळस्कर यांची गणना केली जाते. समाजातील सर्व स्तरातील लोकांना संपूर्ण सहकार्य केले. अशा गोरगरिबांचा त्यांना दुवा लाभत आहेत. हीच त्यांच्या कार्याची पोहोच पावती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात गरीब कुटुंबात जन्म घेतलेले युवा नेते प्रीतम कळसकर यांनी आपल्या कर्तबगार जिद्द व श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले (महाराज साहेब) यांची प्रेरणा घेऊन अल्प काळात खूप मोठी मजल मारली आहे. कर्तबगारही दाखवण्यासाठी अनुभव व वयाची अट नसते. कारण माशाला पाण्यात पोहण्यासाठी कुणाकडून शिकावे लागत नाही तर जन्मताच पाण्यात पोहण्याची कला त्यांना अवगत होते.
युवा नेते प्रीतम कळसकर यांचे वडील चंद्रकांत कळसकर हे साधे रिक्षा चालवणारे होते. परंतु त्यांचे थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आदरणीय श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज यांच्याशी सामाजिक कार्यातूनच कनिष्ठ संबंध आले. दादा महाराज यांच्याशी अनेकदा सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी भ्रमंती करण्याचा योग आला. छत्रपतींच्या घराण्याबद्दल आत्मीयता व जिव्हाळा निर्माण झाल्यापासून बालपणी प्रीतम कळसकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे पाहिले आणि प्रथमदर्शनीच त्या व्यक्तीमत्वाबद्दल त्यांच्या मनात कमालीचा अभिमान व आदर निर्माण झाला. आजही ते छत्रपतींना आपले दैवत मानत आहेत.
युवा नेते प्रीतम कळस्कर हे रेडीमेड कार्यकर्ते किंवा नेते नसून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची ओळख निर्माण करताना सामान्य माणसांसारखे स्वतःही उदरनिर्वाहाचा अनुभव घेतला. दिवसभर लॉन्ड्री व्यवसाय आणि रात्री रिक्षा चालवणे यातूनच त्यांना व्यवहारी ज्ञानाची शिदोरी मिळाली. आज त्या शिदोरीवर ते अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. स्वतःचे सुसज्ज कार्यालय असूनही सामान्य मित्रांच्या बसून चहापाणी व गप्पा मारून ते अनेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. ज्या रिक्षामुळे व मेहनत व परिश्रम ,कष्ट याची जोड लाभली आहे. त्या रिक्षाची आठवण म्हणून आजही त्यांनी ती रिक्षा जतन करून ठेवलेली आहे. त्यांच्या या कार्याला छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद व सौभाग्यवती शिवानी प्रीतम कळसकर यांची मोलाची साथ लाभत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जीवाभावाचे मित्र आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक मैत्री व स्नेह मेळावा आयोजित करत आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वरिष्ठ नेते आणि अधिकारी त्याचबरोबर सामान्य मित्र सुद्धा आपुलकीने आलिंगन देत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असल्याने ते आता युवकांचे रोल मॉडेल ठरलेले आहेत. त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
—- पत्रकार अजित जगताप
सायगाव ता. जावळी जि. सातारा मोबाईल नंबर ९९२२२४१२९९ /९१५६१४०४९१

______________________________________

फोटो– युवा नेते प्रीतम कळसकर

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments