Friday, September 19, 2025
घरमहाराष्ट्रस्वच्छता दूत फाउंडेशनचा स्वच्छता उपक्रम

स्वच्छता दूत फाउंडेशनचा स्वच्छता उपक्रम

मुंबई(रमेश औताडे) : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतो महोत्सवात स्वच्छता दूत फाउंडेशन सक्रियपणे सहभागी झाले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून मुंबई हार्बर लाईनवरील गोवंडी रेल्वे स्थानक येथे दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

गोवंडी रेल्वे स्थानक प्रमुखांच्या उपस्थितीत स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. “स्वच्छता मनाची, स्वच्छता घराची, स्वच्छता परिसराची आणि स्वच्छता देशाची” या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश पाखरे, समन्वयक जितेंद्र साळी, रिबेका पाखरे, समिंदर बाई आठवले, माया साबळे, वायदा कुरेशी, अनिल पाटोळे व नौशात कुरेशी आदींनी विशेष प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments