कराड(प्रताप भणगे) : वाठार ग्रामपंचायतीच्या बैठकीत गावातील सर्व पाणंद रस्ते खुले करण्यास मंजुरी देण्यात आली असून लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. प्रताप पाटील साहेब तसेच कराड तहसीलदार कार्यालय महसुली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही अंमलबजावणी होणार आहे.
दरम्यान, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत “आठवा राष्ट्रीय पोषण महा” विविध थीमआधारित उपक्रमांसह 12 सप्टेंबर 2025 ते 11 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. वाठार येथे आज उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी माननीय सरपंच सौ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी उपसरपंच श्री. स्वप्निल कानडे, माजी उपसरपंच व सदस्य श्री. सचिन पाटील, युवा नेते व माजी उपसरपंच श्री. अभिजीत पाटील, ग्रामसेवक श्री. संजय लिंबाळे, तलाठी श्री. हनुमंत चौधरी, श्री. जयवंत देसाई तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. वाठार गावच्या पोलीस पाटील सौ. ज्योती शिंदे, युवा शेतकरी श्री. सत्यजित (शैलेश) पाटील यांचीही उपस्थिती होती.
वाठार बिटच्या सौ. लिना तेवरे यांनी पोषण महा कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली, तर अंगणवाडी सेविका सुजाता शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अंगणवाडी सेविका सुरेखा पाटील, मनीषा डोईफोडे, विमल जाधव, संगीता पोतदार व मनीषा पाटील यांनी समारंभाचे नियोजन व आयोजन केले.
याशिवाय आशा सेविका, महिला बचत गट, गावातील युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. वाठार प्राथमिक ग्रामीण उपआरोग्य केंद्राच्या माध्यमातून बीपी व शुगरची मोफत तपासणी शिबिरही भरवण्यात आले. यामध्ये आरोग्य सेवक दिपक जोपळै, एन. एन. एम. सौ. तेजस्विनी उंचेकर, आशा सेविका सौ. सारिका कुंभार, सौ. संगीता चव्हाण, सौ. जयश्री माने, सौ. वैशाली मलगौडी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.