प्रतिनिधी : मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सन २०२५ या वर्षात गोपाळकाला (दि. १६ ऑगस्ट) व अनंत चतुर्दशी (दि. ०६ सप्टेंबर) या ऐवजी नारळी पौर्णिमा (दि. ०८ ऑगस्ट) आणि ज्येष्ठगौरी विसर्जन (दि. ०२ सप्टेंबर) या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी सुट्टी मिळाल्याने कर्मचाऱ्यांना शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे.
याचप्रमाणे पुढील आठवड्यात १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), १६ ऑगस्ट (दहीहंडी), व १७ ऑगस्ट (रविवार) या दिवशीही सलग सुट्ट्या असल्यामुळे १५ दिवसांत तब्बल ६ दिवसांची विश्रांती मिळणार आहे. या सलग सुट्ट्यांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले असून, अनेकांनी पर्यटन वा कौटुंबिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू केले आहे.