मुंबई (शांताराम गुडेकर) :स्व.पार्वतीबाई सावळेकर, रोटरी सभागृह, नवीन पनवेल येथे रविवारी “प्रॉपर्टी मंत्रा” कंपनीचे सर्वेसर्वा मॅनेजिंग डायरेक्टर श्री.किशोर जालिंदर माने व सह आयोजक सौ.अश्विनी किशोर माने यांच्या तर्फे “प्रॉपर्टी मंत्रा जल्लोष २०२५” हा कार्यक्रम पार पडला.श्री.संतोष तोत्रे व वंदना पुत्री, पूजा जाधव यांनी सभागृहाचे व्यासपीठ उत्तम प्रकारे संभाळले.तसेच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी श्री.महेंद्र वाघमारे व श्री.शरद घोडके व सौ.विशाखा लाड यांनी आपल्या सुमधुर आवाजात सुंदर गाणी सादर केली. तसेच नृत्य बाल कलाकार कु.यश्वी पोसम व कु.दिव्या बोबडे यांनी पार पाडली.श्री.सुरेश बोबडे यांनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर केल्या.
व्यासपीठावरची सर्व जबाबदारी सौ.स्वरा पोसम व सौ.प्रीती दास यांनी उत्तमरित्या पार पाडली.श्री.किशोर माने यांच्या शुभहस्ते ट्विन्स एसएलआर फिल्म प्रॉडक्शन निर्मित “बेवफा सनम” (ब्रोकन हार्ट) या म्युझिक ऍल्बमचे तसेच “खौफ” या वेब सिरीजच्या बँनरचे अनावरण करण्यात आले.व्यासपीठावर ऍल्बमशी निगडित कलाकार श्री.राहुल साखरे,नवा चेहरा संघवी सुमन व प्रसिद्ध मॉडेल अभिनेता श्री.ग्यान आर जे तसेच श्री.सचिन तांडेल यांनी आपली उपस्थिती लावली. त्याचबरोबर ट्विन्स एसएलआर फिल्म प्रॉडक्शनचे प्रोड्युसर श्री.राजेंद्र देशमुख विश्वासराव तसेच को- ऑर्डीनेटर श्रीमती.राजश्री पाटील उपस्थित होते. त्याचसोबत प्रसिद्ध लेखिका श्रीमती.कुसुम कोडेकर यांनीही उपस्थिती दाखवली होती.”प्रॉपर्टी मंत्रा जल्लोष २०२५” या कार्यक्रमाच्या अंतर्गत आलेल्या सर्व कलाकारांचा तसेच सभासदांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.त्याच सोबत पहिला लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.अशोक यादव व श्री.विशाल घुणकीकर तसेच सौ.साधना तोत्रे व कु.सौम्या घुणकीकर यांनी खूप मेहनत घेतली.तसेच आपल्या विशिष्ट शैलीने श्री.महादेव कुले (गुरुजी) यांनी आपले विचार सभागृहासमोर मांडून प्रोत्साहन देण्याचे उत्तम काम केले.सदर कार्यक्रमाला डॉ.पंकज लोखंडे,श्री.सुभाष पाटील,श्री.अविनाश गायकवाड,श्री.रमेश भिंगारदिवे, श्री.वैभव कांबळे,श्री.गजेंद्र कांबळे.श्री.माणिक राऊत, श्री.राजेश कांबळे,सौ.ज्योत्सना अहिवळे,सौ.सुजाता बनसोडे,श्री.विकास पाटील,सौ.सोनल हाटे,सौ.सुरेखा गायकवाड,सौ.सविता उपाध्याय,कु.निकिता बोंबले, प्रीती कुलकर्णी,कु.नीता सपारिया तसेच बालकलाकार सम्राट घुणकीकर,वेदांग अहिवळे, जान्हवी तोत्रे,आयुष्य भट्टाचार्य,शरण्या बोडके,तसेच कुमारी.प्रांजल किशोर माने यांनी वंदे मातरम या गाण्यावरती उत्कृष्ट नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकली. सौ.सॅन्ड्रा डीसोझा, सौ.रंजना पटेल, श्री.विनोद राठोड, श्री.सुभद्रा पाटील, सौ.लक्ष्मी राव, श्री.अशोक जाधव यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली.शेवटी सर्वाचे आभार व्यक्त करत कार्यक्रमची सांगता करण्यात आली.
“प्रॉपर्टी मंत्रा” कंपनीतर्फे “प्रॉपर्टी मंत्रा जल्लोष २०२५” हा कार्यक्रम संपन्न
RELATED ARTICLES