Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रसाहित्यरत्नअण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याला दिला उजाळा....! संचालक बिभीषण चवरे यांच्या...

साहित्यरत्नअण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याला दिला उजाळा….! संचालक बिभीषण चवरे यांच्या संकल्पनेतून गर्जना शाहीरांची शानदार सोहळा रंगला

प्रतिनिधी : “जग बदल घालून घाव,सांगून गेले भीमराव”असा संदेश देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 1ऑगस्ट रोजी झालेल्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने

गर्जना शाहीरांची हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित असा शानदार सांस्कृतिक कार्यक्रमातून उजाळा दिला.
मुंबई येथील गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात आयोजित केलेल्या
या शानदार सोहळ्याला लोकशाहिरांची मंदियाळी पाहून आलेल्या प्रेक्षकांचा उत्साह ओसांडून वाहत होता.
अण्णाभाऊ यांच्या प्रत्येक गीतांना रसिक जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. प्रेक्षकगृहातून अनेक गाण्यांना ‘वन्स मोर’ मिळत होता.
या कार्यक्रमात लोकशाहीर मधुकर खामकर,दत्ताराम म्हात्रे,निशांत शेख,रामानंद उगले,निलेश जाधव,अविरत साळवी,गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे या सुप्रसिद्ध गायकांनी आपल्या पहाडी आवाजात अण्णाभाऊ यांचा इतिहास जागा केला. त्यांनी लिहिलेल्या रचना गायल्या, विशेष बाबत म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या एका कादंबरीच्या आधारित श्रीनिवास नार्वेकर यांनी कथावाचन केले. अश्विनी कारंडे व गणेश कारंडे यांनी एक छोटीशी नाटीका सादर केले.
आकांक्षा कदम हिने लावणी सादर करून रसिकांची मनं जिंकली.
प्रतिक जाधव यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ आणि मिलिंद बिर्जे यांनी आलेल्या सर्व लोकशाहीरांचे अगत्याने स्वागत केले.
अण्णाभाऊ साठे मराठी साहित्य विश्वात नामवंत प्रसिद्ध प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे साहित्यिक होते.आपल्या साहित्यात लोकसंस्कृतीचे सारी अंगे त्यांच्या कथा,कादंबऱ्या,पटकथा,वगनाट्य,पोवाडे,लावण्या,गीत,नाट्य आविष्कृत केली.त्या अण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याची आठवण ठेवून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी छोटे खानी कार्यक्रमातून उत्कृष्ट उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments