मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य असलेल्या “आम्हाला गर्व हिंदुत्वाचा” या व्हॉट्सॲप ग्रुपतर्फे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला अनुसरून आजवर २६ सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. या श्रेणीत २७ वा उपक्रम म्हणून, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त, मातोश्री, बांद्रा येथे १५० किलो लाडूंचे भव्य वाटप करण्यात आले.
या लाडू वाटप स्टॉलवर शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक यांनी भेट देऊन आपल्या हस्ते लाडू वाटप केले. यावेळी त्यांनी “आम्हाला गर्व हिंदुत्वाचा” या ग्रुपच्या कार्याची स्तुती करत तोंडभरून कौतुक केले.
कार्यक्रमासाठी कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, भंडारा, नाशिक आदी भागांतील ग्रुपचे सदस्य मुंबईत सकाळपासूनच कार्यरत होते. त्यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमाचे मुख्य समन्वयक व आयोजक संतोष पाटील (संस्थापक, संचालक), सुरेश वाडकर (अध्यक्ष), महेंद्र गुरव (संचालक) होते. याशिवाय खालील सदस्यांनीही मोलाचे योगदान दिले:
भालचंद्र उकिर्डे, लवेश म्हात्रे, रंजीत नरवणकर, लिलाधर भोईर, दिलीप गावडे, जितेंद्र पाभरेकर, सुजाता धारगळकर, वासंती गोताड, अनिल कांबळे, संपदा धोंगडे, सोनिया पाटील, संदीप गुरव, प्रवीण कोरपे, विलास चव्हाण, संतोष झोल, खंडू खोचरे, ईश्वर गुळवी, जयाभाऊ दवंडे, बबन शेळके, ललित कुमार मुथा, सागर पाटील, आबा मोहिते, लहू साळुंखे, शांताराम नाईक, अशोक कोळंबकर, अशोक देशमुख, संजय डोर्लेकर, सुनील काप, दिनेश पाटील, संजय पवार, रज्जाक शेख, नामदेव रिंगे, राजेश तिवारी आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी समर्पणाने कार्य केले.
या उपक्रमातून “हिंदुत्वासाठी गर्वाने कार्यरत असलेल्या शिवसैनिकांची एकजूट” अधिक बळकट झाल्याचे सर्व स्तरांतून बोलले जात आहे.