ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

रेल्वे प्रशासन पुन्हा झोपले का? “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस”ऐवजी “CST” असा उल्लेख…. मराठी अस्मितेचा अपमान!

प्रतिनिधी दी.२ मे २०२५ ,: पनवेलहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर आणि अस्वीकार्य बाब समोर आली आहे. गाडीतील डिजिटल इंडिकेटरवर “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)” या अधिकृत नावाऐवजी जुना व अपूर्ण उल्लेख “CST” दाखवला जात आहे.

ही बाब केवळ तांत्रिक चूक नसून, जाणूनबुजून मराठी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावात “महाराज” हा गौरवसंचक शब्द मुद्दाम वगळणे — हे दुर्लक्ष नव्हे, तर अपमान आहे.

रेल्वे प्रशासन अजूनही याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक तक्रारी असूनही गाड्यांच्या डिजिटल बोर्ड, संकेतस्थळे आणि तिकिटांवर चुकीचा उल्लेख कायम आहे. ही निष्काळजीपणा नक्कीच माफ करता येणार नाही.

राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने तात्काळ दखल घ्यावी, तसेच सर्व ठिकाणी योग्य आणि संपूर्ण नाव — छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वापरण्याचे निर्देश द्यावेत.

धन्यवाद,

भिमराव धुळप
मो.९२२१११७६८४

Scroll to Top