ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

घावरी ग्राम सेवा संघाचा उपक्रम…..  “शोध पाण्याचा… संकल्प शेतीचा!” – सामाजिक नाटक ‘साक्षात्कार’चा नाट्यप्रयोग वाशी येथे

मुंबई – घावरी ग्राम सेवा संघ, मुंबई (रजि.) यांच्या वतीने “शोध पाण्याचा… संकल्प शेतीचा!” या संकल्पनेवर आधारित आणि भैरवनाथ नाट्य मंडळ, घावरी प्रस्तुत कौटुंबिक व हृदयस्पर्शी सामाजिक नाटक “साक्षात्कार” याचा सादर नाट्यप्रयोग रविवार, दिनांक ४ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा नाट्यप्रयोग विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.

या कार्यक्रमात आपली उपस्थिती ही संघासाठी सन्मानाची बाब ठरेल व कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होईल, सदर नाटकाचा प्रयोग हा फक्त मदतीसाठी असल्यामुळे समस्त कोयना सोळशी कांदाटी विभागातील १०५ गावातील लोकांनी तसेच दानशूर व्यक्तींनी या पाण्याच्या चळवळीला अवश्य मदत करून सहकार्य करावे , असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Scroll to Top