ताज्या बातम्या
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदनधारावीत लवकरच सुरु होणार… आंदोलनाचा धडाका धारावी बचाव आंदोलनची माहितीधारावी पुनर्विकास सर्वेक्षणात घोटाळ्याचा आरोप; ९६% रहिवासी अपात्र ठरल्याने संताप खा. वर्षा गायकवाड यांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी; वसुलीचा खेळ थांबवण्याचे आवाहनमुंबईत कोलोरेक्टल कॅन्सरबाबत गंभीर अज्ञान; फक्त १८.९% लोकांना शौचात रक्त दिसणे हे लक्षण असल्याची माहितीछोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश

देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर भारतमातेची डिजिटल प्रतिमा बसवण्यात यावी मा.खा. राहुल शेवाळे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी

मुंबई : भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा, मूल्ये, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भारतमातेची डिजिटल प्रतिमा देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर बसवण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्याकडे केली आहे. एका विस्तृत लेखी निवेदनाद्वारे शेवाळे यांनी ही मागणी केली असून या निर्णयाची अंलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना देण्याची विनंती यामध्ये करण्यात आली आहे.

माजी खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात भारतीय इतिहासातील भारतमातेच्या प्रतिमेचे महत्व विशद करताना लिहिले आहे की, भारतमाता म्हणजे जात, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन देशवासीयांना एकत्र आणणारी माता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देखील ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना भारतमातेकडून प्रेरणा मिळाली होती. भारताचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, अध्यात्म आणि ऐक्याचे प्रतीक म्हणजे भारतमाता, असा उल्लेख शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

देशभरातील विमानतळांवर दररोज मोठ्या संख्येने भारतीय आणि विदेशी प्रवासी ये-जा करतात. विमानतळांच्या टर्मिनसवरील दर्शनी भागात भारतमातेची डिजिटल प्रतिमा उभारून जगभरात एक वेगळा संदेश जाईल, असे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रतीमेमुळे राष्ट्रीय ऐक्य आणि भारतीयांचे राष्ट्रप्रेम, भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा आणि विविधतेतील एकता अधोरेखित करता येईल. तसेच, विमानतळांच्या सौंदर्यातही भर पडेल. या कल्पनेचे सर्व भारतीयांकडून स्वागत केले जाईल, असा विश्वासही शेवाळे यांनी व्यक्त केला.

Scroll to Top