ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

Navi Mumbai Girl Murder : उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या करत मृतदेहाची विटंबना, एकतर्फी प्रेमातून हत्या करणाऱ्या आरोपीला कर्नाटक सीमेवरून अटक

नवी मुंबईतील २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या.

Navi Mumbai Girl Murder : नवी मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करत तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. त्यानंतर आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षीय यशश्री शिंदे नावाची तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. उरण शहरातील एनआय स्कूलजवल राहणाऱ्या यशश्रीचा मृतदेह आज कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले. चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री तिच्या कुटुंबीयांसह उरण येथे राहत असून ती बेलापूरमधील एका कंपनीत काम करत होती. गुरुवारी (दि. २५ जुलै) सकाळी कामावर निघाल्यापासून यशश्री बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलीस यशश्रीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील झुडुपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नवी मुंबईतील २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या.
Scroll to Top