ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबईतर्फे दिंडीतील वारकऱ्यांसाठी वडाळा येथे तुळशी वाटप व लाडू वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर) : वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनल जिल्हा 3231 A1 यांच्या संयुक्त विद्यमाने देवशयनी आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी विठ्ठल मंदिर शेजारी वडाळा येथे तुळशी वाटप व लाडू वाटप करण्यात आले. हा वाटपाचा कार्यक्रम मुंबईचे मा.नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023-2024 चे डॉ.जगन्नाथराव हेगडे यांच्या शुभहस्ते पार पडला.तसेच त्यांच्या हस्ते वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र(आयडी) व नियुक्तीपत्र देण्यात आले.याप्रसंगी जागतिक ह्यूमनराइट्स ए.एफ.चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ,महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी अमोल वंजारे,महाराष्ट्र सचिव सौ.ज्योती भोसले,मुंबई सचिव सौ.प्रमिला अडसूळ,महेश आंब्रे,सहसचिव साक्षत म्हात्रे,नंदकुमार बागवे,निराधार शैक्षणिक सामा. संस्था. महाराष्ट्र महिला कार्याध्यक्षा सौ.वसुधा वाळुंज,लितेश केरकर तसेच लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन चे लायन सुभाष भोसले,लायन सौ.सुरेखा जगन्नाथराव हेगडे,लायन दिलीप वरेकर,लायन अशोक पवार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top