ताज्या बातम्या

लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन डी.जी.रुपारेल कॉलेजमध्ये महिला आरोग्य आणि स्वच्छता उपक्रम यशस्वीपणे संपन्न

मुंबई(संतोष गावडे ) : महिलांचे आरोग्य, सन्मान आणि समाजसेवा प्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करत,लायन्स इंटरनॅशनल 3231-ए 1 लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन व लायन्स क्लब ऑफ मुंबई एलीट सोबत आणि सफ्रॉन चे अध्यक्ष व डीजी स्पेशल स्कॉड गर्ल्स हेल्थ चाइल्ड अँड अवेअरनेस डिस्ट्रिक्ट चे लायन जितेंद्र सकपाळ यांच्या सहकार्याने डी.जी. रुपारेल कॉलेज, मुंबई येथे सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सिंग मशीन ची स्थापना व उद्घाटन यशस्वीपणे पार पाडले. ₹75,520 किमतीच्या या प्रकल्पाचा लाभ 500 हून अधिक मुली आणि महिलांना होणार आहे. यामुळे स्वच्छतेबाबत जागरूकता वाढेल आणि आवश्यक स्वच्छता सुविधांची सहज उपलब्धता सुनिश्चित होईलया कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट ट्युनिंग चेअरपर्सन ॲड.अकील हाफिझ हे प्रमुख पाहुणे म्हणून व सेकंड डिस्ट्रिक्ट व्हाइस गवर्नर आणि लायन सायरस सुरती उपस्थित होते.यावेळी कॉलेज च्या ट्रस्टी श्रीमती अनिता हमदे,रजिस्टार्ड श्री.मोहन लोंढे उपस्थित होते.श्रीमती अनिता हमदे यांनी लायन्स क्लब ऑफ मुंबई या उपक्रमाचे कौतुक केले. टीम सफ्रॉन ला समाजसेवेसाठी अभिनंदन केले.भविष्यातही अशा समाज कल्याणकारी उपक्रमांसाठी आपले सहकार्य कायम राहील असे आश्वासन दिले,.प्रकल्पाच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत मोलाचे सहकार्य करणाऱ्या रजिस्ट्रार श्री.मोहन लोंढे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमा दरम्यान लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन चे सचिव लायन संजू ससमल यांनी क्लबच्या सेवाकार्याची आणि ध्येयाची माहिती दिली.तसेच त्यांनी अ‍ॅडव्होकेट अकील हाफिझ यांचे मनापासून आभार मानले. कारण त्यांनी कॉलेजमधील मासिक पाळी स्वच्छतेची सुविधा अधिक बळकट करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन प्रायोजित करण्याची उदार घोषणा केली.हा प्रकल्प प्रकल्प अध्यक्षा लायन नीरजा सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली व हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट (HDCT), लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई एलीट यांच्या सहकार्याने पूर्ण झाला.या प्रभावी उपक्रमाद्वारे लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन ने महिलांचे सक्षमीकरण, स्वच्छतेचा प्रसार आणि करुणा व उद्देशाने समाजसेवा करण्याचा आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे त्याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन चे एक्सटेंशन चेअरमन लायन विजय रायमाने,लायन मोहन वायदंडे,खजिनदार लायन ज्योती राणे,लायन नितीन कोलगे,लायन हबीब अन्सारी, लायन भाग्यश्री वर्तक,लायन नितीन पन्हाळकर तसेच लायन्स क्लब ऑफ मुंबई एलीट चे लायन चे प्रेसिडेंट लायन अमित ढोलम,लायन उमेश कोणवस्कर,लायन मनोज यादव,लायन दमयंती आचरेकर,लायन शोभा परुळेकर व कॉलेज मधील शिक्षक वृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Scroll to Top