ताज्या बातम्या

शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्षपदी दिपाली पाटणकर तर सचिवपदी चंद्रकांत गंगावणे यांची निवड

सातारा : शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
यामध्ये लोकनाट्य तमाशा मंडळातील प्रसिद्ध लावणी कलाकार दिपाली पाटणकर यांची सातारा जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार चंद्रकांत बापूराव गंगावणे यांची सातारा जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्ती प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, सातारा जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, ह.भ.प. अशोक महाराज मांढरे (सातारा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष), तसेच सदस्य प्रवीण महांगडे आणि संग्राम दादा कदम उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Scroll to Top