ताज्या बातम्या

७५ दिव्यांनी ओवाळणी औक्षण आणि केक यांचा संगम ! स्वर हार्मनीच्या गीतांच्या नजराण्याने सौ. सुनंदा धोंडू घरटकर यांचा अमृतमहोत्सव साजरा

मुंबई : आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकारानंतर शिकणे अ आ ई ! कवीश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांच्या कवितेतून आईची थोरवी/महती अधोरेखित करण्यात आली आहे. कोकणचे सुपुत्र आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यानावाने रत्नागिरी जवळील ईस्पितळाचे अत्याधुनिक उपकरणांनी नूतनीकरण करणारे बोरीवली पूर्व येथील उद्योजक विजय धोंडू घरटकर यांनी आपल्या मातोश्री सौ. सुनंदा धोंडू घरटकर यांचा अमृतमहोत्सवी सोहळा छोटेखानी सभागृहात साजरा केला. ७५ दिव्यांनी सुवासिनींनी ओवाळणे, औक्षण करणे, पदस्पर्शाने आशीर्वाद घेणे आणि मग हल्लीच्या पद्धतीनुसार केक कापून, तो भरवून उपस्थितांचा आनंद शतगुणित करणे यात आणखी सोहळ्यात रंग भरण्यासाठी संगीत संयोजक नीलेश माळी यांच्या स्वर हार्मनी वाद्यवृंदाचे गायक गायिकांनी भावगीत, भक्तीगीत पासून तर उडत्या गाण्यांचा नजराणा पेश केला. जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील श्री साईबाबा मंदिर सभागृहात सायंकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत सौ. सुनंदा धोंडू घरटकर यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. उद्योजक विजय धोंडू घरटकर यांनी आपल्या आईचा देवदुर्लम अमृतमहोत्सवी सोहळा आयोजित करतांना वडिल धोंडू घरटकर यांनाही त्याच पद्धतीने सन्मानित केले. सुंदर असे मानपत्र विजय घरटकर यांनी लिहून त्याची भव्य प्रतिमा आई वडील यांना अर्पण केले. खड्या आवाजात त्याचे वाचन केले. कुटुंबातील सुवासिनींनी ७५ दिवे प्रज्वलित करून त्या दिव्यांनी सौ. सुनंदाबाईंना ओवाळले. त्यांचे औक्षण करुन मिठाई भरविण्यात आली. ‘बार बार दिन ये आये’च्या सुरात केक कापण्यात आला. मग स्वर हार्मनीच्या गायिका सौ. मीना नाईक इंगळे यांनी गणरायाच्या सुश्राव्य गीताने प्रारंभ केला. गायक दिनेश विचारे यांच्या बरोबरच स्वर हार्मनी मध्ये नुकतेच दाखल झालेले विजय घरटकर यांनी आपल्या सुरेल स्वरांनी साथ दिली. कधी एक तर कधी युगल गीत सादर केल्यामुळे संपूर्ण सभागृहात भारलेले वातावरण निर्माण झाले. कन्या प्राची विजय घरटकर यांनी सुद्धा वडिलांच्या सोबतीने युगल गीत गायिले. हे गीत सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. मीना इंगळे नाईक यांच्या मुंगडा या उडत्या गाण्याच्या वेळी अख्खी तरुणाई थिरकली तसेच सौ. प्रणाली विजय घरटकर, कन्या प्राजक्ता विजय घरटकर, प्राची विजय घरटकर यांच्या बरोबरीने उपस्थित महिलांनी नृत्य सादर करुन धम्माल उडवून दिली. संगीत संयोजन सुजीत जाधव यांनी केले. सौ. सुनंदा धोंडू घरटकर यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी लष्करी जवान प्रशांत चांदगुडे, सुनिल माळी, अनंत रेवाळे, महादेव, पांडुरंग धामणे, मित्रपरिवार मनीष भोसले, समीर मोरे , प्रमोद सावंत, मनोज दळवी व सौ. मंजिरी दळवी, दीपक धामणे, विनायक धामणे, परशुराम घावाले तसेच भाऊ मनोहर घरटकर, अमोल घरटकर सतीश घावाले, सुशांत होडबे, राजेंद्र कदम, उमेश धामणे आदी मान्यवर उपस्थित होते. सहभोजन करुन सर्वांनी निरोप घेतला.*

Scroll to Top