ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

शिरसटवाडीत रंगणार क्रिकेट स्पर्धेचा थरार; S.P.L पर्व दुसरे जल्लोषात

शिराळा : (अमोल पाटील) गावातील क्रिकेटप्रेमी युवकांच्या पुढाकारातून शिरसटवाडी प्रीमियर लीग (S.P.L) पर्व दुसरे या भव्य क्रिकेट स्पर्धेची तयारी सध्या जोरात सुरू असून, संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाला गावकऱ्यांनीही मनापासून सहकार्य करत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी हातभार लावला आहे.
या स्पर्धेत शिरसटवाडी, खटिंगवाडी आणि माळवाडी या परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, स्थानिक पातळीवर क्रिकेटचा उत्सवच साजरा होत आहे. एकूण ६ संघ या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवणार आहेत. सहभागी संघांमध्ये श्री. मोरया 11, श्री. समर्थ वॉरियर, छत्रपती शासन, जय हनुमान स्पोर्ट्स, साई स्वराज वॉरियर आणि राजवीर एस.डी. लायन्स यांचा समावेश आहे.
ही स्पर्धा शिरसटवाडी-गुढेपाचगणी मार्गालगत असलेल्या शिरसटवाडी पठारावर दिनांक १० व ११ मे २०२६ रोजी खेळवण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळणार असून, गावकऱ्यांसाठी ही एक मोठी क्रीडा मेजवानी ठरणार आहे.
दरम्यान, स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण आणि भव्य मिरवणूक दिनांक ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
शिरसटवाडी प्रीमियर लीगमुळे गावातील तरुणांना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळत असून, क्रीडासंस्कृतीला चालना मिळत आहे. या स्पर्धेमुळे परिसरात एकोपा आणि उत्साह वाढण्यास मदत होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Scroll to Top