ताज्या बातम्या

भाजपा नेते प्रसाद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सायन रुग्णालयात रुग्णांना मोफत चादर वाटप

मुंबई : भाजप नेते व विधान परिषद सदस्य तसेच भाजप मुख्य प्रतोद (कॅबिनेट मंत्री दर्जा) प्रसाद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ठीक १ वाजता सायन रुग्णालयात रुग्णांना मोफत चादर वाटप कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमांतर्गत सुमारे २५० रुग्णांना चादरींचे वितरण करण्यात आले. रुग्णांना दिलासा देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी भाजप मुंबई कार्यकारिणी सदस्य श्री आशिष साळसकर यांच्यासह शेहबाज खान, मंगेश काकडे, राजकुमार गुप्ता, निहाल वारसी, आझम, मुन्ना, आयुब, मेहमूद आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री उदय गंगाराम नांदे यांनी केले.

Scroll to Top