मुंबई : पत्रकारांना मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आज डोंगरी पोलीस ठाण्यात जर्नालिस्ट असोशीएशन च्या राष्ट्रीय अध्यक्षा अॅड. स्मिता चिपळूणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली.
या प्रकरणात संबंधित गुन्हेगारांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत.
याबाबत योग्य आणि तत्पर कारवाई केल्याबद्दल जर्नालिस्ट असोशीएशन च्या वतीने डोंगरी पोलिसांचे आभार मानण्यात आले. तसेच, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आले.




