ताज्या बातम्या

साताऱ्यात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दारू दुकान बंदीच्या निर्णयाचे स्वागत…

सातारा (अजित जगताप) : संपूर्ण जगभर महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती धूमधडाक्यात साजरी होत आहे. अनेक विधायक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये काही समाज कंटक व विघ्न संतोषी नशापान करतात. त्यांना आळा घालण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील अधिकृत दारू दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. खऱ्या अर्थाने संविधानाचे रक्षण होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे.

याबाबत सातारा पोलीस अधीक्षक यांचे पत्र क्रमांक जिविशा-३/डॉ आंबेडकर जयंती / २०२६ १७६५ सातारा दिनांक सात एप्रिल २०२६ रोजी क्रमांक :- बीपीए ११२०२६/व लि.आदेश सातारा, दिनांक १० एप्रिल २०२६.
मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी याना प्रदान
केलेल्या अधिकाराचा वापर केला आहे.या नुसार आदेश देण्यात येतात की. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कायदा व
सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी म्हणजे दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी
सातारा जिल्हयातील सर्व देशी दारू किरकोळ विक्री (सीएल-३) विअर विक्री परवाने (एफएल / बीआर-२). विदेशी मद्य विक्री (एफएल-२), परवानाकक्ष (एफएल-३), बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकान टिडी-१ या अनुज्ञप्तीची जागा
व विक्री पुर्णपणे बंद ठेवण्याच्या आहेत.
सदर आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाने उल्लघन केल्यास त्यांचे
विरूध्द मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ व त्या अंतर्गत असलेल्या नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल. तसेच अनुज्ञप्ती वदच्या कालावधीची नुकसान भरपाई दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. असे सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी परिपत्रक काढले आहे.
हे परिपत्रक सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारक (मार्फत संबंधित निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सर्व कार्यकारी अकार्यकारी निरीक्षक/दु, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांना माहिती व पुढील
कार्यवाहीस्तव अग्रेषित.
त्यांना निर्देशित करण्यात आले आहे.येते की, सदर आदेशाची प्रत सर्व संबंधितास देऊन त्यांच्या अधिपत्याखालील सर्व स्टाफसह कार्यक्षेत्रात गस्त घालून सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल याची दक्षता घ्यावी. असेही सूचित केले आहे. दरम्यान या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशाचे पालन जर कोणी केले नाही तर याबाबत कोणतेही दया माया दाखवू नये. तसेच शासकीय ज्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारीचे पालन न केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करावी. अशी मागणी अँड संजय गायकवाड, नितीन कांबळे, अजित जगताप व फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वारसा जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

__________________________________

फोटो — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करताना बालिका.. व जिल्हाधिकारी आदेश … (छाया – अजित जगताप, सातारा)

Scroll to Top