ताज्या बातम्या

घावरी ग्रामपंचायतीत वॉटर फिल्टर सिस्टीमचे लोकार्पण “स्वच्छ पाणी… सुरक्षित आरोग्य” उपक्रमातून ग्रामस्थांना मोठा दिलासा

मौजे – घावरी ता.महाबळेश्वर : ग्रामपंचायत घावरी या महाबळेश्वर तालुक्यातील गावाला १०५ गाव समाजातील असंख्य गावांना गोरगरिबांचे कैवारी, समाज बांधवांच्या मूलभूत गरजांची जाण असलेले, सदैव मदतीचा हात देणारं दाभे मोहन गावचे सुपुत्र, युवा उद्योजक (इटली),समाजसेवक सन्माननीय श्री. चंदन सुनीता राजाराम चव्हाण यांनी शनिवार दिनांक ११.०४.२०२६ रोजी वाॅटर फिल्टर सिस्टीम प्रदान करून सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी एक “पाणी” ही “स्वच्छ पाणी….. सुरक्षित आरोग्य” देऊन आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत मोलाचा आणि तितक्याच स्तुत्य आहे.
यासाठी घावरी ग्राम सेवा संघ, मुंबई मंडळाचे अध्यक्ष, श्री बाळकृष्ण भगवान सकपाळ श्री. प्रकाश किसन सकपाळ, मंडळाचे प्रमुख सल्लागार श्री. तानाजी लक्ष्मण सकपाळ श्री. रमेश गणपत सकपाळ आणि त्यांचे इतर सहकारी कार्यकर्ते यांनी “आपला गाव….. आपलं आरोग्य” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गावाला वॉटर फिल्टर सिस्टीम ची मागणी केली होती त्या मागणीला श्री शैलेश शिंदे यांनी मान्यता देऊन ती आज प्रत्यक्षात उभी राहिली आहे.
याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी घावरी गावास सौरऊर्जेवर चालणारे दिवे देऊन “गाव अंधारातून….. प्रकाशाकडे” नेण्याचे कार्य सुद्धा आपले लाडके समाजसेवक सन्माननीय श्री. चंदन सुनिता राजाराम चव्हाण यांच्या माध्यमातून झालं आहे. दरम्यान सोनाट गावचे समाजसेवक श्री. विठ्ठल कदम हे सदर सिस्टिम लावण्यास आवर्जून उपस्थित होते.*
*वॉटर फिल्टर सिस्टीमची जोडणी करते वेळी ग्राम पंचायत घावरीचे उपसरपंच श्री. विजय सावजी सकपाळ , पोलिस पाटील यास्मिन आरिफ शारवान, गावचे प्रमुख जेष्ठ कार्यकर्ते श्री. राजाराम धारू सकपाळ, श्री. नारायण हरिश्चंद्र सकपाळ, श्री किसन बाबू सकपाळ ,श्री.किसन मालु जाधव, श्री. सोमाजी कोंडीबा सकपाळ, श्री. प्रकाश नामदेव सकपाळ, श्री. तुकाराम राजाराम सकपाळ आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सविस्तर सूत्रसंचालन घावरी ग्राम सेवा संघ मुंबई मंडळाचे हिशेब तपासणी श्री. किसन शांताराम जाधव यांनी केले.
स्वच्छ पाणी ‌…… सुरक्षित आरोग्य” या सेवाभावी योजनेमुळे समाजसेवक सन्माननीय श्री. चंदन सुनिता राजाराम चव्हाण यांच्या समाजसेवेची संपूर्ण भागासह महाबळेश्वर तालुक्यात चर्चा सुरू आहे.
त्यामुळे घावरी ग्रामस्थांमध्ये चांगल्या आणि स्तुत्य उपक्रमाचं गुणगान आणि “निरोगी आरोग्य” या संदर्भात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Scroll to Top