नवी मुंबई : भारत सरकारने 2027 मध्ये लोकसंख्या जनगणना कार्यक्रम जाहीर केला आहे. जनगणना कार्यक्रमाचा अंतीम कालावधी दि. 1 मार्च 2027 रोजी 00:00 वा. आहे. भारत देशामध्ये दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. यावर्षी भारताची पहिली डिजिटल जनगणना होत आहे.
जनगणना 2027 ही स्वतंत्र दोन टप्प्यातील असून घर यादी व घरगणना हा पहिला टप्पा दि. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत पार पाडेल व दुसरा टप्पा फेब्रुवारी /मार्च 2027 मध्ये पार पडेल. प्रत्यक्ष क्षेत्र कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी 15 दिवस अगोदर म्हणजेच दि. 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणनेचा (SELF ENUMERATION) पर्याय उपलब्ध असेल. स्वगणना हा एक नाविन्यपूर्ण व सोयीस्कर पर्याय आहे व त्यामध्ये आपल्या सोयीनुसार सुरक्षित वेब पोर्टल वापरून आपल्या कुंटुंबाची माहिती स्वत:हून ऑनलाईन भरण्याची मुभा उपलब्ध आहे.
त्या अनुषंगाने जनगणना कार्य निदेशालय, महाराष्ट्र यांचेकडील नियुक्त मास्टर ट्रेनर श्रीम.तेजल कटारे, सहा. संचालक जनगणना तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडील नियुक्त मास्टर ट्रेनर, उप अभियंता श्री. स्वप्नील देसाई यांचेमार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 8 विभाग कार्यालयातील नियुक्त केलेल्या45 फिल्ड ट्रेनर, यांचे प्रात्याक्षिकांसह प्रशिक्षण दि. 6/4/2026 ते 11/4/2026 या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका (मुख्यालय) येथे आयोजित करण्यात आले होते.
याकरिता बेलापूर येथील सेक्टर 8 मध्ये सर्व फिल्ड ट्रेनर यांना स्वत: प्रगणक बनवून तसेच नवी मुंबई क्षेत्रामध्ये अंदाजे 500 पर्यवेक्षक व 3100 प्रगणक यांना त्या विभाग क्षेत्रातील फिल्ड ट्रेनर हे दि. 26/4/2026 ते दि. 8/5/2026 या कालावधीमध्ये प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर प्रगणक व पर्यवेक्षक हे त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील प्रत्येक गटातील घरगणना आकडेवारी दि. 16 मे 2026 ते 15 जून 2026
सदर प्रशिक्षणामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, अतिक्रमण उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, मालमत्ता कर विभागाचे उप आयुक्त डॉ.अमोल पालवे तसेच उपआयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी श्री. संजय शिंदे यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी सर्व प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना प्रोत्साहीत करून मार्गदर्शन केले.




