ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात एस.टी.बस थांब्यावर महागड्या खाद्य वस्तूने ग्राहकांचे होते लूट…

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यात विविध प्रवासी दररोज प्रवासासाठी घराबाहेर पडतात. अशावेळी त्यांना जेवण व नाश्ता आणि पाण्यासाठी एस.टी. बस थांबा व हॉटेल धाब्यावर अवलंबून राहावी लागते. सध्या उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत आहेत. एसटी बस ही सर्वसामान्य माणसांसाठी आजही दळणवळणाचे साधन आहे. परंतु सध्या सातारा जिल्ह्यातील अनेक एस.टी. बस थांबे आहेत . या स्टॉलवर प्रवाशांना पंधरा रुपयांचे थंड पिण्याचे पाण्याची बाटली तीस रुपयाला विकतात. दहा रुपये किमतीचा वडा तीस रुपयाला विकला जातो. या एस टी बस थांबा असणाऱ्या हॉटेल व धाब्यांवर अक्षरशा आर्थिक लूट केली जाते. वर्षानुवर्षे अन्न व औषध प्रशासनाच्या विभागामार्फत त्याची कायदेशीरच्या तपासणी होत नाही. मूळ कंत्राटदार आणि त्याची देखभाल करणारे तिसरा कंत्राटदार असे तीन वाटेकरी हॉटेल व धाब्याच्या माध्यमातून राजेरोसपणाने दरोडा टाकत आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना इच्छा असूनही अशा एसटी बस थांब्यावरील महागडे खाद्यपदार्थ विकत घेणे परवडत नाही. सामान्य प्रवासी एस. टी. मधून अर्धे तिकीट असणारे महिलावर्ग व वयोवृद्ध आणि अपंग प्रवासी प्रवास करत असतात. त्यांना महागडे खाद्यपदार्थ घेणे परवडत नाही. फक्त सातारा जिल्ह्यात अशा धाबे व हॉटेलमधून लूट सुरू आहे. याबाबत राजकीय पक्षाचेही हितसंबंध गुंतल्यामुळे ते सुद्धा हा मूलभूत प्रश्न उपस्थित करत नाहीत. सध्या कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सामान्य माणसांच्या प्रश्नावर आवाज उठवतील. अशी अशी सामान्य एस.टी. प्रवाशांना वाटू लागलेली आहे. याबाबत प्रवासी संघटनेने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारावा अशी मागणी पुढे आलेले आहे. ——————————- फोटो –सातारा जिल्ह्यामध्ये महागडे खाद्यपदार्थ राजुर उसपणाने विक्री करणारे एस.टी बस थांबा, हॉटेल व ढाबा चर्चेचा विषय ठरला आहे.

Scroll to Top