ताज्या बातम्या

बाळापूर महोत्सव पर्व २ उत्साहात संपन्न; मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषमय सोहळा

बाळापूर : महाराष्ट्र बाजारपेठ आयोजित बाळापूर महोत्सव पर्व २ मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भिमराव यशवंत आंबेडकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवाची रंगत अधिकच वाढली. “स्वर साक्षी” प्रस्तुत कार्यक्रमांत विविध कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली.
विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध तसेच श्री स्वामी समर्थ व साईबाबा यांच्या वेशभूषेत सादर झालेल्या कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
महोत्सवा

दरम्यान महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यात टीव्ही, फ्रेश प्रेशर कुकर, इस्त्री, महिलांसाठी पैठणी, सोन्याची नथ, चांदीच्या गणेश-सरस्वती मूर्तींचे फ्रेम, तसेच पुरुषांसाठी विविध बक्षिसे देण्यात आली.
या सोहळ्याला सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, तसेच स्थानिक पोलीस प्रशासन उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथातून काढलेल्या मिरवणुकीदरम्यान समता सैनिक दलाने सलामी देत अभिवादन केले.
महाराष्ट्र बाजारपेठेचे डॉ. कौतिक दांडगे, सीईओ अनुजा दांडगे यांचा लहान मुलगा कुमार अद्वित दांडगे यांनी श्री स्वामी समर्थ गीत सादर करून उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला.
यावेळी विधिमंडळ सचिव विलास आठवले,सिने कलाकार रश्मी अनपट, विवेक सांगळे, निकिता घोरपडे, तन्मय पाटेकर, तसेच ढोलकीच्या तालावर प्रसिद्ध मीनाक्षी व सीमाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात पार पडला.

Scroll to Top