ताज्या बातम्या

साताऱ्यात स्पर्धा परीक्षा पुस्तक भेट देऊन डॉ. आंबेडकर जयंती साजरी होणार….

सातारा(अजित जगताप) : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना अधिकार दिले आहेत. तसेच जबाबदारी सुद्धा दिलेले आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी यंदाची डॉ .आंबेडकर जयंती ही स्पर्धा परीक्षेतील पुस्तके मोफत भेट देऊन साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनेक मान्यवरांनी मनापासून स्वागत केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये एक महिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचबरोबर युगपुरुषांची संयुक्त जयंती साजरी होत आहे. सर्वधर्मसमभावाची भावना व्यक्त करून दलित, पद दलित व बौद्ध वस्तीमध्ये हा सण दिवाळी सारखा साजरा होतो. डी.जे., विद्युत रोषणाई ,सजावट, डॉल्बी व मनोरंजन आणि नाचगाणे या बाबींसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये जातात. या सर्व पैशाचा सकारात्मकरित्या उपयोग होत नाही. त्यापेक्षा वाड्या वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम राबवले हे सुद्धा गरजेचे आहे.
अनेक जणांना वर्गणी देताना सुद्धा आर्थिक हिशोब कोलमडून पडत असतो. काहीजण इतरांकडून वर्गणी गोळा करून आपल्या स्वतःचीच सोय करतात आणि नावाला उत्सव साजरी करतात. हे सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे. त्याबाबत टीका करणे योग्य नाही. परंतु, या सर्व खर्चाला फाटा देऊन स्पर्धा परीक्षेमध्ये गोरगरीब कष्टकरी दलित, पददलित आदिवासी व गरीब समाजाला सहभागी होता यावे. यासाठी स्पर्धा परीक्षेला लागणारी मार्गदर्शन पुस्तिका भेट म्हणून देण्यात येणार आहे.
लाखभर रुपये खर्च होणार असला तरी उद्योजक व रिपब्लिकन सेना महाराष्ट्राचे नेते श्री रमेश अनिल उबाळे व त्यांच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते स्वयंपूर्ण पुढे आलेले आहेत. रिपब्लिकन सेना राष्ट्रीय नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर, अमन आंबेडकर व महाराष्ट्राच्या रिपब्लिकन सेनेच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात मोफत पुस्तिका वाटण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.
गोरगरीब व पदवीधर व स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा . असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. बॅनरने प्रतिमा उजळून निघत नाही. तर खऱ्या अर्थाने सामाजिक भान व जाणीव ठेवून केलेल्या कामच समाजापर्यंत पोहचवले जाते. हे सुद्धा यानिमित्त सिद्ध झाले आहे . या उपक्रमाचे फुले- शाहू- आंबेडकर चळवळ मनापासून राबवणाऱ्या भीमसैनिकांनी स्वागत केले आहे. सर्व जाती धर्मातील लोक यंदाच्या डॉक्टर आंबेडकर जयंतीला सहभागी होत असल्याने खऱ्या अर्थाने हा देशाचा उत्सव होत आहे. यावेळी सच्चा आंबेडकर अनुयायांनी सुद्धा जबाबदारीचे भान ठेवावे अशी ही विनंती त्यांनी केली आहे. या उपक्रमाबद्दल रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक अण्णा उबाळे, अँड संजय गायकवाड , जमीर भोसले, नंदकुमार वाघमारे, प्रेमानंद जगताप, आनंद फणसे, विशाल भोसले, नितीन रोकडे व मान्यवरांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

——————————————————

फोटो– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना श्री रमेश अनिल उबाळे (छाया– निनाद जगताप सायगाव)

Scroll to Top