नवी मुंबई (उलवे) – उलवे सेक्टर-०९ येथील परिसरात घडलेल्या भाडे व्यवहारातील मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मुख्य आरोपी दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
फिर्यादी करुणा मिश्रा यांच्या तक्रारीनुसार, १० मे २०२५ रोजी आरोपी आणि यांनी त्यांना जास्त डिपॉझिटच्या नावाखाली फसवणूक केली. या प्रकरणात फिर्यादींकडून ₹२३,००,००० (तेवीस लाख रुपये) IMPS द्वारे आयसीआयसीआय बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले होते.
आरोपींकडून व्यवहाराची खात्री पटवण्यासाठी बनावट बँक पावती देण्यात आली होती. मात्र, नंतर ती पावती एडिट केलेली व खोटी असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे फिर्यादींना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
दरम्यान, तपासादरम्यान आरोपींपैकी एक जण दुबईला पळून गेल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अधिक सखोल तपास सुरू असून आरोपींना पकडण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
या घटनेमुळे नागरिकांनी भाडे व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. कोणतीही मोठी रक्कम देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची खातरजमा करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि कायदेशीर करार करणे अत्यावश्यक आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या फसवणुकीचा बळी ठरल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.




