यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग असोशियन मधील वादाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि एकप्रकारे सुरू असलेल्या वादावर पडदा टाकल्याची चर्चा रंगली.
मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटन सोहळ्यास असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शेवाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष रणजीत सावरकर, तसेच बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव प्रमोद कुमार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राकेश तिवारी, मिलन वैद्य, आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, दीपक सावंत, संजय निरुपम, मनीषा कायंदे, किरण पांडव, देवांग यांसह अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग यांचाही समावेश होता.
कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले,
“खासदार चषकाच्या माध्यमातून आम्ही ६५ विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देत आहोत. बॉक्सिंगसारख्या दमदार खेळाला देशात मोठी संधी आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित खेळाडूंमध्ये उत्साहाची लाट उसळली.
विशेष म्हणजे, गडकरी यांनी स्वतः बॉक्सिंगचे ग्लोव्हज परिधान करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कृतीने कार्यक्रमात वेगळाच रंग भरला आणि उपस्थित प्रेक्षकांनीही जोरदार प्रतिसाद दिला.
देशभरातून सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देताना त्यांनी आवाहन केले की, “ही स्पर्धा तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ आहे. मेहनत करा आणि देशाचं नाव उज्वल करा.” असे सांगितले.
या दमदार उद्घाटनामुळे नागपूरमध्ये बॉक्सिंगचा उत्साह शिगेला पोहोचला असून, देशभरातील युवा खेळाडू रिंगमध्ये आपली ताकद आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.